Posts

सुंदर बायको

Image
 सुंदर बायको कंटाळला होता तो,साहेबाच्या बोलण्याला,नेहमीच्या प्रवासाला. त्यालाही वाटत होतं,जरा कुठे तरी जावं,लोकं कसं जातात थंड हवेच्या ठिकाणी तसं. त्यालाही वाटायचं एकाच रंगाचे कपडे घालून बायकोसोबत फोटो काढावा न् तो डिपीवर मिरवावा पण छे! घरात दोन तरणीताठी मुलं,एक पोरगा,एक पोरगी. दोघंही कॉलेजला जाणारी. बायको आताशी त्याला मिळतच नव्हती. मुलांसोबत झोपायची. तिची चिडचिड असायची नेहमीचीच.  पैसा पुरत नव्हता. कमावणारा एक नि खाणारी पाच तोंडं. पाचवं तोंड आईचं. आईची सत्तरी होऊन गेली होती पण खाण्यापिण्याबाबत अगदी उत्साही. नातवंडं पाणीपुरी खायला गेले की हिला पार्सल लागायचंच.  लेक मोटरसायकलसाठी मागे लागलेला केव्हाचा. बायकोने बजावून ठेवलय,या दिवाळीत तरी त्याला बाईक घेऊया म्हणून. आईला तिरुपतीला जायचंय म्हणे,तिच्या ज्येष्ठांच्या ग्रुपसोबत. लेकीला महागडा क्लास लावायचाय. कसे आणि कुठे कुठे मेनेज करु पैसे..त्याचं डोकं विचाराने भंडावून जायचं. ती मात्र त्याच्या मनातले सारे विचार न सांगता ओळखते. घरातल्या प्रत्येकाला सबुरीने घ्यायला सांगते. लेक जवळ येऊन म्हणालाच,"पप्पा ,नकोच ती गाडी..डिझेलची झंझट. म...